Welcome to Lai Mast

Sunday, December 5, 2010

धमाल मराठी विनोद






बबनराव : बंड्या जरा इकडं ये पाहू

बंड्या : ओ बाबा

बबनराव : अरे, सकाळपासून बघतोय तुझी आई एकदम गप्प गप्प आहे 

ती? काय झालंय तरी काय?  




बंड्या : नाय ओ, त्याचं काय आहे ना बाबा.. आईने मला सकाळी हाक 

मारली. म्हणाली, मला कपाटातली लिपस्टिक आणून दे. 


बबनराव : मग? 


बंड्या : पण मला ती सापडलीच नाय... मग त्याऐवजी मी तिला 

फेव्हिस्टिकच नेऊन दिली.


-----------------------------------------------------

बबनराव - तुमच्याकडे मारुतीचे स्पेअर पार्ट आहेत का?
दुकानदार - हो, आहेत ना, काय पाहीजे?
बबनराव - एक गदा द्या


---------------------------------------------------------------


[ मालकाला नोकर समजून ]
बाई      -   काय रे, तू ह्या बाईकडे कधीपासून कामाला आहेस?
मालक -   मी होय? पुष्कळ वर्षे आहे.
बाई      -  तुला पगार बरा मिळतो का?
मालक -  काय सांगू, दिवसभर काम केल्यावर दोन वेळचे जेवण आणि अंग झाकायला कपडे मिळतात.
बाई      -  बिचारा, माझ्याकडे कामाला येशील? मी तुला जेवून खाऊन महिन्याला १००/- रुपये देईन.
मालक -  जरुर आलो असतो. पण बाईंबरोबर मी जन्माचा करार केला आहे.
बाई      - हा कसला करार? ही तर निव्वळ गुलामगिरी आहे.
मालक - तुम्ही त्याला गुलामगिरी म्हणता, आम्ही त्याला लग्न म्हणतो

--------------------------------------------------------------------------------

शाम- आई, पिवळा रंग महाग असतो का ग?
आई- नाही.
शाम- मग तू शेजारच्या काकूंना सांगत होतीस ना, हल्ली मुलीचे हात पिवळे करायला खूप पैसे जमवावे लागतात

--------------------------------------------------------------------------------

मन्याबापू - सध्या जमाना कठीण आलाय. आता स्त्री-पुरुष सारखेच ढगळ कपडे घालतात. त्यामुळे कोण स्त्री आणि कोण पुरुष हे ओळखणे फ़ार अवघड झांलय.
सोन्याबापू - त्यात अवघड काय आहे? जी व्यक्ती सारखी बोलत असते ती बाई समजावी आणि जी एकत असते ती व्यक्ती पुरुष समजावी

---------------------------------------------------------------------------

पती - साहेब, या शिपायाने इथे आम्हा पती-पत्नीला उगीचचं पकडून आणलय. आम्ही तर आमच्या गल्लीमध्ये अगदी फ़ालतू गोष्टींवर भांडत होतो.
इन्सपेक्टर - पण घरात भांडायच सोडून तुम्ही गल्लीत का भांडत बसला होतात?
पती - म्हणजे? आमचे फ़र्निचर आम्हीच तोडावं असं तुम्हाला वाटतंय का..?

-----------------------------------------------------------------------------------

आंधळा भिकारी - आंधळयाला पैसा द्या बाबा.
गोपाळराव - अरे, पण तू कशावरुन आंधळा आहेस ?
आंधळा भिकारी  - साहेब, ते पहा समोर, तुम्हाला नारळाचं झाड दिसतं का?
गोपाळराव - हो, दिसतं ना.
आंधळा भिकारी - ते मला दिसत नाहीये


---------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment